नोटेवर लक्ष्मी, गणपतीची प्रतिमा कोरा, अशी सूचना खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या हेतूनं केजरीवालांनी ही मागणी केली आहे. तर तिकडे केजरीवालांच्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी आप आणि केजरीवालांवर निशाणा साधलाय.